- मृतांच्या संख्येने ओलांडला 20 हजारांचा टप्पा
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत मागील 24 तासात 12, 481नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 347 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना संक्रमणाचा दर वाढून 17.76 इतका झाला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या 13,48,699 वर पोहोचली आहे.
त्यातच मागील 24 तासात 13,583 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 12 लाख 44 हजार 844 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 20,010 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांचा वाढता आकडा ही चिंतेची बाब ठरताना दिसत आहे. सद्य स्थितीत 83,809 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 79 लाख 49 हजार 571 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 54,619 आरटीपीसीआर टेस्ट आणि 15,657 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 55,661 झोन आणि 780 कंट्रोल रूम आहे.