ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत आज दिवसभरात 1,808 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 69 हजार 412 वर पोहचली आहे. यामधील 13 हजार 550 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे आज 1446 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख 51 हजार 473 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4389 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 15 लाख 26 हजार 655 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 6920 आरटीपीसीआर टेस्ट आणि 16,013 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.