ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत दिवसभरात 2,920 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 37 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 85 हजार 672 वर पोहचली आहे. यामधील 26,450 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- एका दिवसात 3,171 रुग्ण कोरोनामुक्त
दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 3,171 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 2 लाख 53 हजार 784 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5,438 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 31 लाख 91 हजार 646 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 11,105 आरटीपीसीआर टेस्ट आणि 45,153 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.