ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत मागील 24 तासात 3,428 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 22 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 3 लाख 24 हजार 459 वर पोहचली आहे. यामधील 22,814 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 3,197 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 2 लाख 95 हजार 699 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5,946 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 38 लाख 85 हजार 309 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 15,660 आरटीपीसीआर टेस्ट आणि 42,485 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.
सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 5.90 % आहे. तर 2747 झोन आणि 293 कंट्रोल रूम आहेत.