- कोरोना बाधितांनी ओलांडला 6. 72 लाखांचा टप्पा
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत मागील 24 तासात 3,567 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारी नुसार, मागील 24 तासात 2,904 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 72 हजार 381 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 6 लाख 48 हजार 674 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 11,060 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू दराचे प्रमाण 1.65 % इतके आहे. सद्य स्थितीत 12,647 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 48 लाख 20 हजार 857 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 57,296 आरटीपीसीआर टेस्ट आणि 22,321 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 4.48 % आहे. तर 2,618 झोन आणि 762 कंट्रोल रूम आहे.