ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत दिवसभरात 4 हजार 006 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 86 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 74 हजार 380 वर पोहचली आहे. यामधील 31,769 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 5, 036 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 5 लाख 33 हजार 351 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 9,260 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 63 लाख 46 हजार 521 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 30,297 आरटीपीसीआर टेस्ट आणि 28,159 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत.
सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 6.85 % आहे. तर 5669 झोन आणि 338 कंट्रोल रूम आहेत.