ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. मागील 24 तासात 409 नव्या कोरोना रुग्ण आढळून आले. बुधवारी 3 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 42 हजार 439 वर पोहचली आहे. यामधील 2020 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 286 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 29 हजार 485 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,934 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 30 लाख 11 हजार 703 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 42,187 आरटीपीसीआर टेस्ट आणि 27,623 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.