ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली आणि एनसीआरमध्ये आज सायंकाळी 5.45 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.5 रिश्टर स्केलचे हे धक्के होते. सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. राष्ट्रीय आपत्ती कृती दलाचे महासंचालक सत्यनारायण प्रधान यांनीही यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे.
पूर्व दिल्लीत भूकंपाचे सर्वाधिक धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते.