ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीतील कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाटय़ाने घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात 29 नवे रुग्ण आढळून आले. तर एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. आरोग्य विभागाकडून शनिवारी मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, कालच्या दिवशी 48 रुग्ण बरे झाले आहेत. सद्य स्थितीत 393 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील 261 रुग्ण हे रुग्णालयात दाखल आहेत. होम आयसोलेशनमध्ये 101 रुग्णांवर उपचार सुरु आहे. कोविड केअर सेंटरमध्ये केवळ 02 आणि कोविड आरोग्य केंद्रात एकही रुग्ण नाही आहे.
राजधानीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 37 हजार 685 वर पोहोचली आहे. त्यातील 14 लाख 12 हजार 212 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य स्थितीत संसर्ग दर 0.4 टक्के इतका आहे. तर आतापर्यंत 25,080 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दिल्लीत आतापर्यंत जवळपास 2 कोटी 55 लाख 00 हजार 410 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 51,263 आरटीपीसीआर टेस्ट आणि 21,171 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 170 झोन आहेत.
- आतापर्यंत एकूण 1. 30 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत मागील 24 तासात 1,53,691 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 1,04,494 जणांना पहिला डोस तर 49,197 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 1 कोटी 30 लाख 16 हजार 787 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यातील 93,12, 558 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 37,04,229 नागरिकांना दुसरा डोस घेतला आहे.