ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मागील 24 तासात 138 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आत्तापर्यंत 6 लाख 24 हजार 182 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रविवारी दिल्लीत 125 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 36 हजार 160 वर पोहचली आहे. यामधील 1, 096 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 12 लाख 00 हजार 551 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 42,524 आरटीपीसीआर टेस्ट आणि 12,866 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.