ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत मागील 24 तासात 1,649 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 5,158 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. तर 189 जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्लीमध्ये संसर्गाच्या दरात घट झाली असून 2.42 % इतका झाला आहे.
सद्य स्थितीत दिल्लीतील रुग्णालयात 15 हजार 388 बेड रिकामे आहेत. तर कोविड केअर सेंटरमध्ये 6 हजार आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये 517 बेड रिकामे आहेत. सध्या 15 हजार 844 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
मागील 24 तासात 64,319 रूग्णांना लस देण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत एकूण 50 लाख 81 हजार 898 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 14 लाख 16 हजार 868 वर पोहचली असून त्यातील 13 लाख 66 हजार 056 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 23,202 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत 27 हजार 610 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.