ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. अनेक राज्यांत मोफत लस दिली जात आहे. त्यातच राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, दिल्ली सरकारने निर्णय घेतला आहे की, 18 वर्षांवरील सर्वानाच मोफत लस दिली जाणार आहे.
पुढे ते म्हणाले की, आम्ही दिल्लीत 1 कोटी 34 लाख लस खरेदीसाठी मान्यता दिली आहे. पुढे केजीवाल म्हणाले की, आम्ही लवकरात लवकर याची खरेदी करू आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू. 1 मे पासून दिल्लीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केलेे जाईल.
लसीच्या निर्मात्यांनी सांगितले आहे की, ते राज्य सरकारला 400 रुपये आणि दुसऱ्यांनी सांगितले की 600 रुपयांना लस देणार आहेेत. दूसरीकडे ही लस केंद्र सरकारला 150 रुपयात दिली जाणार आहे. पण केंद्र, राज्य आणि खासगी रुग्णालयांना एकाच किंमतीत लस मिळाली पाहीजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
केजरीवाल यांनी लस निर्मात्यांना आवाहन केले आहे की, लसीची किंमत 150 रुपयांनी कमी करावी. फायदा मिळवण्यासाठी अजून पूर्ण जीवन आहे. ती वेळ आता नाही आहे. आता भयंकर महामारी सुरू आहे. त्यामुळे मी केंद्र सरकारलाही विनंती करतो की, केंद्र सरकारने यात दखल घेत दर निश्चित केले पाहीजेत.