ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रात्री उशिरा ही कारवाई केली. अटक करण्यात आलेले दोन दहशतवाद्यांपैकी एक जम्मू-काश्मीरच्या बारामुला आणि एक कुपवाडा येथील राहणारे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. तसेच या दोघांकडून दोघांकडून स्फोटक आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. दिल्ली पोलिसांना या दोघांसंदर्भात माहिती मिळाली होती. त्यानंतर या दोन दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सापळा रचला आला होता. सोमवारी रात्री 10.15 वाजता जैश-ए-मोहम्मदच्या दोन्ही दहशतवाद्यांना सरायकाले खां येथील मिलिनियम पार्कजवळ अटक करण्यात आली. तसेच या दोन दहशतवाद्यांकडून काही हत्यारंही ताब्यात घेण्यात आली आहेत.
चौकशी दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही दहशतवादी दिल्ली-एनसीआरमधील काही ठिकाणी स्फोट घडवून आणण्याचा कट रचत होते. यांच्या निशाण्यावर अनेक व्हिआयपी देखील होते. पोलिसांनी यांच्याकडून दोन सेमी ऑटोमॅटिक पिस्तोल आणि 10 जीवंत काडतूसं जप्त केली आहेत. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. सध्या या दोघांची चौकशी सुरु असून याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.