ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
भारतात ही ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचं वातावरण पसरले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने देशाची राजधानी दिल्लीत अखेर विकेण्ड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. राजधानीत शुक्रवारी सकाळी १० ते सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत कर्फ्यू लागू असणार आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पत्रकार परिषद घेत निर्बंधांची माहिती देणार आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ही कोरोनाची लागण झाली असुन याबाबत केजरीवाल यांनी माहिती दिली आहे. आपल्याला कोरोनाची सौम्य लक्षणे असून घरात स्वत:ला विलगीकरण कक्षात वेगळे केल्याची माहीती ही त्यांनी दिली आहे. दिल्लीत सद्या वेगाने कोरोनाचा संसर्ग फैलावत असून चिंता वाढली आहे. सोमवारी दिल्लीत कोरोनाचे ४०९९ रुग्ण आढळले होते. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे मंगळवारी सकाळी ११ वाजता डीडीएएमची एक बैठक देखील आय़ोजित करण्यात आली. या बैठकीत कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे .