ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मिरच्या काही भागात हिमवृष्टीनंतर उत्तर भारतातील बऱ्याच भागात तापमानाचा पारा घसरला आहे. शुक्रवारी राजधानी दिल्लीमध्ये तर किमान तापमान 7.5 डिग्री सेल्सिअस ची नोंद झाली. जे मागील 14 वर्षांतील सर्वात कमी तापमान होते.
स्कायमेट वेदरचे प्रमुख महेश पला वत यांच्या मते, किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवले जाते आणि सामान्य 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी येते त्यावेळी हिम वर्षा मानली जाते.
गुरुवारी दिल्लीत किमान 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर मागील 24 तासात म्हणजेच शुक्रवारी तापमान आणखी कमी होऊन 7.5 अंश सेल्सिअसवर आले. थंडीच्या चालू मोसमातील आणि मागील 14 वर्षातील हे सर्वात कमी तापमान आहे. दिल्लीत 19 ते 21 नोव्हेंबर या काळात सामान्यतः तापमान 12.3 अंशाच्या आसपास असते. पण यावर्षी सरासरीच्या तुलनेत तापमान बरेच खाली आले आहे.
- मागील 5 वर्षातील नोव्हेंबर मधील आकडे
- वर्ष कमाल किमान
- 2019 32.3 11.4
- 2018 31.6 10.5
- 2017 32 7.6
- 2016 32 9.7
- 2015 32 11.0