ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आज 60 व्या दिवशीही सुरूच आहे. शुक्रवारी शेतकरी आणि सरकार यांच्यातील चर्चेची 11 वी फेरीही निष्फळ ठरल्याने शेतकरी 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनादिवशी ट्रॅक्टर रॅली काढण्यावर ठाम आहेत. या रॅलीसाठी शेतकऱ्यांनी पोलिसांचीही परवानगी मिळवली आहे.
शेतकरी ट्रॅक्टर रॅली शांततेत आणि शिस्तबद्ध पध्दतीने काढणार आहेत. रॅलीत एक रुग्णवाहिकाही असणार आहे. तर सिंघु सीमेवरून निघालेली ट्रॅक्टर रॅली संजय गांधी ट्रान्सपोर्ट, कंझावला, बवा, औचंदी सीमेवरून हरियाणासाठी रवाना होणार असून, टिकरी सीमेवरून निघालेली ट्रॅक्टर रॅली नागलोई, नजफगढ, ढांसा, बादली या मार्गावरून केएमपीला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे.