- आतापर्यंत 6 लाख 25 हजार 025 रुग्ण कोरोनामुक्त!
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत मागील 24 तासात 150 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 36 हजार 946 वर पोहचली आहे. यामधील 1,031 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 158 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 25 हजार 025 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,891 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 15 लाख 68 हजार 892 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 38,213 आरटीपीसीआर टेस्ट आणि 18,689 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.