ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. देशाची राजधानी दिल्लीत तर चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीत मागील चोवीस तासात आता पर्यंतचे सर्वाधिक म्हणजेच 1877 नवे कोरोना रुग्ण आढळून आले.
त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 34 हजार 687 वर पोहचली आहे. यामधील 20 हजार 871 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आता पर्यंत 12 हजार 731 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
तर कालच्या दिवसात 65 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता पर्यंत 1085 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.