ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत मागील 24 तासात 1,984 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 37 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 73 हजार 098 वर पोहचली आहे. यामधील 27,123 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- एका दिवसात 4,052 रुग्ण कोरोनामुक्त
दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 4,052 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 2 लाख 40 हजार 703 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5,272 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 29 लाख 61 हजार 056 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 7672 आरटीपीसीआर टेस्ट आणि 28,630 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.
सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 5.47 % आहे. तर 2465 झोन आणि 112 कंट्रोल रूम आहेत.