ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. मागील 24 तासात दिल्लीत 2024 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 22 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 73 हजार 390 वर पोहचली आहे. यामधील 14 हजार 793 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे रविवारी 1249 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख 54 हजार 171 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4426 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 15 लाख 69 हजार 096 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 6881 आरटीपीसीआर टेस्ट आणि 13,556 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.