ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत मागील 24 तासात 256 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर एका रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 38 हजार 849 वर पोहचली आहे. यामधील 1,231 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 193 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 26 हजार 712 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,906 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 22 लाख 55 हजार 443 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 41,775 आरटीपीसीआर टेस्ट आणि 20,993 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.