ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत मागील 24 तासात 3,324 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 44 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 3 लाख 17 हजार 548 वर पोहचली आहे. यामधील 21,903 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 2,867 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 2 लाख 89 हजार 747 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5,898 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 37 लाख 71 हजार 273 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 12,596 आरटीपीसीआर टेस्ट आणि 44,354 रैपिड एंटिजेन टेस्ट बुधवारी करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 8.42% आहे.