ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कुंडली सीमेवर शेतकरी आंदोलनादरम्यान मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास एका 74 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दुपारी 12 च्या सुमारास या शेतकऱ्याच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर काहीच वेळात त्यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत या आंदोलनादरम्यान 10 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
गुरमित सिंग (वय 74) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते पंजाबमधील मोहारी जिल्ह्यातील कांडला या गावचे रहिवासी होते.दरम्यान, सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने मक्खन खान (वय 42) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर मागील 19 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान टिकरी सीमेवर सहा आंदोलकांचा मृत्यू झाला. त्यापैकी बहुतेक जण मध्यमवयीन होते. त्यामधील एकाचा गाडीत भाजल्याने तर इतरांचा हृदयविकाराच्या झटक्याने आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. कुंडली सीमेवर चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एकाचा रस्ते अपघातात तर तिघांचा हृदयविकाराच्या झटक्याने दोघांचा मृत्यू झाला.