ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली आयआयटीने स्वस्तातील कोरोना टेस्ट किटची निर्मिती केली आहे. ‘कोरोश्योर’ असे या किटचे नाव असून, केंद्र सरकारकडून आज या किटचे लॉन्चिंग करण्यात आले.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक आणि मनुष्यबळ खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी लॉन्च केलेले हे टेस्ट किट न्यूटेक मेडिकल कंपनी उपलब्ध करून देणार आहे. या किटमुळे स्वस्तात दर महिन्याला 20 लाख चाचण्या करणे शक्य होणार आहे. या किटला आयसीएमआर आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने परवानगी दिली आहे.