ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली आणि एनसीआरमध्ये मागील 24 तासांत दुसऱ्यांदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 2.7 रिश्टर स्केल एवढी होती. सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा, गाझियाबाद आणि गुडगाव येथे भूकंपाचे धक्के जाणवले.
दरम्यान, काल सायंकाळी 5.45 वाजताही दिल्लीत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.5 रिश्टर स्केलचे हे धक्के होते. काल संध्याकाळी झालेल्या भूकंपाचे केंद्रबिंदू जमिनीपासून अवघ्या 8 किलोमीटर खाली असल्याचे सांगण्यात आले. आयएमडीच्या म्हणण्यानुसार पूर्व दिल्ली हे या भूकंपाचे केंद्रबिंदू होते. मागील 24 तासात दुसऱ्यांदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.