वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2022 आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱया दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंसाठी नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले.
आता दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू 2022 आयपीएल स्पर्धेत ही नवी जर्सी परिधान करणार आहेत. निळय़ा व लाल रंगातील या जर्सीवर दिल्ली कॅपिटल्सचा लोगो ठळकपणे असेल. दिल्लीतील अरूण जेटली स्टडियममध्ये शनिवारी या नव्या जर्सीच्या अनावरण समारंभाला या संघाचे निवडक शौकिन उपस्थित होते. शहरातील निवडण्यात आलेल्या विविध लहान मुलांना ही नवी जर्सी भेट म्हणून देण्यात आली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचा सलामीचा सामना 27 मार्चला मुंबई इंडियन्स संघाविरूद्ध बेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.