वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या कारभारामध्ये आर्थिक भ्रष्टाचार मोठय़ा प्रमाणात लपविला गेला असून या संघटनेचा कारभार अध्यक्षाशिवाय चालू असून सचिव सध्या तुरूंगामध्ये आहे. तथापि दिल्ली किकेट संघटनेचा कारभार हाताळण्यासाठी भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने हंगामी समिती नियुक्त केली आहे.
दिल्ली क्रिकेट संघटनेतील आर्थिक भ्रष्टाचारामुळे भारतीय क्रिकेट नियंत्रण
मंडळाकडून या संघटनेला दिली जाणारी वार्षिक ग्रॅट थांबविण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वी दिल्ली क्रिकेट संघटनेच्या सदस्यांबरोबर टेलिकॉन्फरन्सद्वारे चर्चा करून हंगामी समितीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्ली क्रिकेट संघटनेच्या सर्व स्तरावरील आर्थिक भ्रष्टाचाराबाबत असंख्य तक्रारी बीसीसीआयकडे करण्यात आल्या होत्या. या संघटनेला सध्या अध्यक्षाची तसेच सचिवाची उणीव भासत आहे. बीसीसीआयकडून या समस्येवर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे सांगण्यात आले.