- शुक्रवारपासून सुरू होणार शो
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोविड 19 च्या नियमांचे पालन करत 16 ऑक्टोबर पासून दिल्लीतील सिनेमा थिएटर सुरू होत आहेत. त्यामुळे दिल्लीतील सर्वच थिएटर्स मध्ये साफ सफाई आणि सॅनिटायझेशनचे काम जोरात सुरू आहे.
दिल्ली गेट जवळील डिलाइट थिएटरमध्ये शुक्रवारी दुपारी पहिला शो होणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना डिलाइट थिएटरकडून सांगण्यात आले की, सध्या मॉर्निंग शो स्थगित करण्यात आले आहेत. तसेच शुक्रवारपासून केवळ ई तिकीट असलेल्यांना येथे पिक्चर पाहता येणार आहे. लोकांसाठी थर्मल स्क्रीनिंग असेल, तसेच लोकांच्या हातांचे सॅनिटायझेशन केले जाणार आहे.
तसेच मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप असलेल्यांना च प्रवेश दिला जाईल. तसेच सिनेमा पाहणाऱ्या लोकांचे नाव आणि मोबाईल नंबर घेतले जातील. म्हणजे जर कोणत्याही प्रकारे कोरोनाचा संसर्ग ची माहिती मिळाल्यास संबंधित लोकांना फोनवरून सूचित केले जाईल.
यासोबतच 10 वर्षांपेक्षा लहान आणि 65 पेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना थिएटरमध्ये येण्यास परवानगी नसेल. सुरुवातीला केवळ तीन शो दाखवले जाणार आहेत. तसेच दोन शो मध्ये अर्धा तासाचे अंतर असेल तसेच एक शो झाल्यावर सर्व खुर्च्यांचे सॅनिटायझेशन केले जाणार आहे.