पोलिसांची मोठी कारवाई : जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फेब्रुवारीमध्ये उत्तर-पूर्व दिल्लीत झालेल्या दंगलीत हात असल्याच्या आरोपाप्रकरणी पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा जेएनयूचा माजी विद्यार्थीनेता उमर खालिदला अटक केली आहे. अवैध कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या (युएपीए) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने खालिदला 11 तासांच्या दीर्घ चौकशीनंतर बेडय़ा ठोकल्या आहेत.
दिल्ली दंगलीप्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने 2 सप्टेंबर रोजी काही तास चौकशी केली होती. तत्पूर्वी पोलिसांनी दंगलीशी संबंधित अन्य एका प्रकरणी उमरच्या विरोधात युएपीए अंतर्गत गुन्हा नोंदविला होता. तसेच पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला होता.
यापूर्वीही अटक
उमर खालिद सर्वप्रथम 2016 मध्ये जेएनयूत झालेल्या कथित देशविरोधी घोषणबाजीप्रकरणी चर्चेत आला होता. जेएनयूचा माजी विद्यार्थीसंघ अध्यक्ष कन्हैया कुमारसह देशद्रोहाप्रकरणी मुख्य आरोपींमध्ये खालिदचा समावेश आहे.
सर्वांची चौकशी सुरू दंगलीदरम्यान हिंसाचार फैलावण्याचा कट रचणारे तसेच समुदायांमध्ये सांप्रदायिक उन्माद निर्माण करणाऱया