ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत दिवसभरात 3,229 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 21 हजार 553 वर पोहचली आहे. यामधील 28, 641 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब आज दिवसभरात 3374 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख 88 हजार 122 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4,770 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 21 लाख 83 हजार 316 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 9859 आरटीपीसीआर टेस्ट आणि 35,025 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.