ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना व्हायरसची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच आता दिल्लीच्या दक्षिण भागातील एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोना ची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यानंतर तब्बल 72 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कारण या सर्वांना कोरोना झालेल्या डिलीव्हरी बॉयने पिझ्झा डिलीव्हर केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेला पिझ्झा बॉय मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत काम करत होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात या पिझ्झा बॉयला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच, प्रशासनाने तातडीने डिलीव्हरी बॉयच्या संपर्कात आलेल्या सर्वांची माहीत मिळवली आणि त्यांना क्वारंटाईनकेले.
दक्षिण दिल्लीचे डीएम मिश्रा यांनी सांगितले की, क्वारंटाईन करण्यात आलेल्या 72 जणांपैकी अजून कोणाचीही कोरोना ची टेस्ट केली नाही आहे. यामधील जर कोणामध्ये कोरोनाची लक्षणे दिसली तर आम्ही त्यांची कोरोना टेस्ट केली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, या घटनेमुळे आता लॉक डाऊन च्या काळात ऑनलाईन फूड ऑर्डर करणे कितपत सुरक्षित आहे यावरही प्रश्न उपस्थित झाला आहे.