- सफदरजंग रुग्णालयात दाखल
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे रातोरात प्रसिद्ध झालेले ‘बाबा का ढाबा’ चे मालक कांता प्रसाद यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून ते मानसिक तणावात होते आणि गुरुवारी रात्री त्यांनी झोपेच्या गोळ्या खाल्या. झोपेच्या गोळ्या खाल्याने त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना आयसीयूमध्ये आहेत.
पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, मालवीय नगर या भागात रस्त्याशेजारी कांता प्रसाद हे आपला ढाबा चालवत होते. गुरुवारी रात्री आम्हाला पीसीआर वरून एक फोन आला की, कोणीतरी आत्महत्येचा प्रयत्न करीत आहे. ज्यावेळी आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि पाहिले की हे 80 वर्षीय कांता प्रसाद आहे. यावेळी त्यांच्या पत्नी बदामा देवी यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून ते तणावात होते. दरम्यान, पोलीस या घटनेकडे आत्महत्येचा प्रयत्न या नजरेने पाहत असून अधिक तपास करीत आहेत.
- लॉकडाऊनमध्ये बंद झाले होते नवीन हॉटेल
कांता प्रसाद हे एका व्हायरल व्हिडिओमुळे देशात प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या मदतीसाठी अनेक जण पुढे आले होते आणि त्यांना मदत केली होती. त्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधार आला होता. या मदतीतून त्यांनी एक हॉटेल देखील सुरू केले होते. मात्र, लॉकडाऊनमध्ये त्यांना हे हॉटेल बंद करावे लागले होते.
दरम्यान, कांता प्रसाद यांनी इंस्टाग्राम इन्फ्ल्यूएंसर आणि यूट्यूबर गौरव वासनविरोधात पैशांचा घोटाळा केल्याची तक्रार दाखल केली होती. कांता प्रसाद यांना पैसे देण्याचे आवाहन गौरव याने केले होते. ही पोस्ट खूप वायरल झाली. पण गौरवने कांता प्रसाद यांचा अकाऊंट नंबर न देता स्वत:चा अकाऊंट नंबर दिला असल्याची तक्रार कांता प्रसाद यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी त्याची माफी देखील मागितली होती. यावर प्रतिक्रिया देताना वासन यांनी आपण त्यांना माफ केले असल्याचे सांगितले होते.