वृत्त संस्था/ अबु धाबी
येथे सुरू असलेल्या अबु धाबी टी-10 क्रिकेट स्पर्धेत डॉम्निक ड्रेक्सच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली बुल्स सघाने अबु धाबी संघाचा 49 धावांनी दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता दिल्ली बुल्स आणि डेक्कन ग्लॅडियटर्स यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. तसेच अबु धाबी आणि बांगला टायगर्स यांच्यात तिसऱया स्थानासाठी प्ले ऑफ सामना खेळविला जाईल.
शुक्रवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली बुल्स संघाने 10 षटकात 7 बाद 109 धावा जमविल्या. रोमारिओ शेफर्डने 26 तर रूदरफोर्डने 19 धावा जमविल्या. अबु धाबी संघातर्फे लिव्हिंगस्टोनने 7 धावात 2 गडी बाद केले. शेफर्डने 16 चेंडूत 26 धावा पटकाविल्या. आदिल रशीदने 5 चेंडूत 13 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल अबु धाबी संघाचा डाव 8.3 षटकात 60 धावांत आटोपला. दिल्ली बुल्स संघातील ड्रेक्सने 13 धावांत 4 गडी बाद केले. अबु धाबी संघाच्या डावात सॉल्टने 15 तर ख्रिस गेलने 14 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली बुल्स 10 षटकात 7 बाद 109 (शेफर्ड 26, रूदरफोर्ड 19, अदिल रशीद 13, लिव्हिंगस्टोन 2-7), अबुधाबी- 8.3 षटकात सर्वबाद 60 (सॉल्ट 15, गेल 14, ड्रेक्स 4-13).