वृत्तसंस्था/ अबुधाबी
येथे सुरू असलेल्या अबुधाबी टी-10 क्रिकेट स्पर्धेत शनिवारी दिल्ली बुल्स संघाने बांगला टायगर्सचा सहा गडय़ांनी पराभव केला. या स्पर्धेतील दिल्ली बुल्स संघाचा हा सलग दुसरा विजय आहे.
बांगला टायगर्सविरुद्ध सामन्यात दिल्ली बुल्सने नाणेफेक जिंकून बांगला टायगर्सला प्रथम फलंदाजी दिली. बांगला टायगर्स 10 षटकात 6 बाद 69 धावा जमविल्या. त्यानंतर दिल्ली बुल्स संघाने 8.1 षटकात 4 बाद 71 धावा जमवित हा सामना सहा गडय़ांनी आणि 11 चेंडू बाकी ठेवून जिंकला.
बांगला टायगर्सच्या डावामध्ये लंकेच्या उदानाने नाबाद 21 तर फॉकनरने नाबाद 19 धावा जमविल्या. या जोडीने 25 चेंडू 41 धावांची भागीदारी केली. दिल्ली बुल्सतर्फे अदिल रशीदने 6 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्ली बुल्स संघातील रुदरफोर्डने 14 चेंडूत 27 धावा फटकाविल्या. मॉर्गनने 16 चेंडूत नाबाद 26 धावा जमवित आपल्या संघाला विजय मिळवून दिला. बांगला टायगर्सतर्फे फॉकनरने 9 धावात 2 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक
बांगला टायगर्स ः 10 षटकात 6 बाद 69 (उदाना नाबाद 21, फॉकनर नाबाद 19, अदिल रशीद 2-6), दिल्ली बुल्स 8.1 षटकात 4 बाद 71 (रुदरफोर्ड 27, मॉर्गन नाबाद 26, फॉकनर 2-9).