देशाच्या राजधानीत घडली मानवतेला काळीमा फासणारी घटना
नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशाची राजधानी दिल्लीत मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दिल्लीतील एका मशिदीच्या मौलानाला 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी यूपीच्या गाझियाबादमध्ये आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 30 मे रोजी रात्री ११ वाजता हर्ष विहार ठाण्यातील पोलिसांना एका अल्पवयीन मुलीवर मशिदीमध्ये बलात्कार झाल्याची माहिती मिळाली होती. यानंतर दिल्ली पोलिस घटनास्थळी पोहचली. त्यावेळी पोलिसांना मशिदीच्या बाहेर लोकांची गर्दी पाहायला मिळाले. यावेळी पीडितेचे कुंटुब मशिदीच्या इमाम म्हणजे मौलानावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करत असल्याचे पोलिसांच्या नजरेज आले. यानंतर तातडीने पीडितअल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणीसाठी करण्यासाठी पाठवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी कलम 376 पॉस्को कायद्यांतर्गत आरोपीविरूद्ध एफआयआर नोंदवून घटनेचा तपास सुरू केला.
#JusticeForOurGirl का ट्रेंडमध्ये आहे हा हॅशटॅग ?
देशाच्या राजधानी घडलेल्या या घटनेचा समाजाच्या सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. सोशल मीडियावर देखील #JusticeForOurGirl हा हॅशटॅग आज सकाळपासून ट्रेंडमध्ये आहे. या हॅशटॅगच्या माध्यमातून या पीडित अल्पवयीन मुलीला न्याय मिळावा म्हणून नेटकरी मागणी करत आहे. आशा घटनांमुळे महिला असतील किंवा अल्पवयीन मुली यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येतो. नेटकऱ्यांकडून देखील महिलांच्या सुरक्षेवरून प्रश्न उपस्थित केला जात आहे.