ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या खोलीला आज सकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, आगीमुळे राज्यपालांच्या खोलीतील फर्निचरचे मोठे नुकसान झाले असून सर्व सामान बाहेर काढण्यात आले आहे. तसेच राज्यपालांच्या खोलीच्या आसपासच्या खोल्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.