- सद्य स्थितीत 8,838 ॲक्टिव्ह रुग्ण
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. काल पुन्हा एकदा एक हजारच्या वर रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी 1,819 नव्या कोरोना रुग्ण आढळून आले. तर 11 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 62 हजार 430 वर पोहचली आहे. यामधील 8 हजार 838 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात केवळ 399 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 42 हजार 565 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 11,027 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 45 लाख 75 हजार 662 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 36,808 आरटीपीसीआर टेस्ट आणि 30,262 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.