शरद पवार का नारा है, हर किसान हमारा है
प्रतिनिधी / सोलापूर
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात देशस्तरावर शेतकरी संघटनांनी दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनांला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात सर्व समविचारी शेतकरी संघटना व कामगार संघटना राज्यभर आंदोलन करत आहेत. दिल्ली येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज शनिवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. शरद पवार का नारा है, हर किसान हमारा है च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते प्रमुख पदाधिकारी तसेच सर्व सेलचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. आजच्या आंदोलनाला सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष भारत जाधव, शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, प्रदेश प्रवक्ता मनोहर सपाटे, जेष्ठ पदाधिकारी जनार्दन कारमपुरी, ज्येष्ठ नेते राजन जाधव, आदी प्रमुख उपस्थिती होते.