ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली विद्यापीठाच्या पदवीपूर्व कार्यक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया 2 ऑगस्टपासून सुरू केली जाणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू पी.सी. जोशी यांनी शनिवारी दिली.
पुढे ते म्हणाले, पोस्ट ग्रज्युएट (पीजी) कार्यक्रमांची नोंदणी प्रक्रिया 26 जुलै पासून सुरु होणार आहे. तर यूजी आणि पीजी कार्यक्रमांसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख अनुक्रमे 31 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट निर्धारित करण्यात आली आहे.
- शुल्काची रचना मागील वर्षाप्रमाणेच असेल
मिळालेल्या माहितीनुसार, अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी फीची रचना व पात्रतेचे निकष मागील वर्षाप्रमाणे ठेवले आहेत. यासह, महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना कोणतेही अतिरिक्त फॉर्म भरू नये असेही सांगितले आहे.