ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी दिल्ली सरकारकडून ई – वाहन धोरण जाहीर करण्यात आले. त्यासोबतच याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून लोकांना प्रोत्साहन राशी देखील दिली जाणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक वाहन धोरण तयार आहे. याला दिल्ली सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. आजपासून पुढे जेव्हा पाच वर्षांनंतर इलेक्ट्रिक व्हिकलची चर्चा केेली जाईल, त्यावेळी दिल्लीचे नाव अव्वल स्थानी असेल.
पुढे ते म्हणाले, दिल्ली सरकार इलेक्ट्रिक व्हिकल धोरणाच्या अंतर्गत इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्या लोकांना आर्थिक मदत देणार आहे. टू व्हीलरसाठी 30 हजार रुपये, कारसाठी 1.5 लाख रुपये तर ऑटो रिक्षा आणि ई रिक्षेसाठी 30 हजार रुपये प्रोत्साहन राशी म्हणून दिले जाणार आहेत.