वृत्तसंस्था/ दुबई
जसप्रित बुमराह (3-17) व ट्रेंट बोल्ट (3-21) यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजीला मोठे भगदाड पाडल्यानंतर मुंबई इंडियन्सने आयपीएल साखळी सामन्यात 9 गडी राखून एकतर्फी विजय मिळवला आणि गुणतालिकेत 18 गुणांसह आपले अव्वलस्थान आणखी भक्कम
केले.
प्रारंभी, बुमराह-बोल्टच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीला 20 षटकात 9 बाद 110 अशा किरकोळ धावांवर समाधान मानावे लागले.
प्रत्युत्तरात मुंबईने 14.2 षटकात एका गडय़ाच्या बदल्यात सहजपणे विजयाचे लक्ष्य गाठले. 72 धावा जमवणाऱया इशान किशनच्या फटकेबाजीमुळे मुंबईने 15 व्या षटकात विजयावर कब्जा
केला.
मुंबई इंडियन्सच्या खात्यावर आता 18 गुण असून त्यांचा अद्याप एक सामना बाकी आहे. त्यांनी प्ले-आफॅसाठी यापूर्वीच आपली पात्रता निश्चित केली आहे.
दुसरीकडे, दिल्लीचा संघ 14 गुणांसह तिसऱया स्थानी राहिला. आरसीबीच्या खात्यावर देखील 14 गुण आहेत आणि दिल्लीपेक्षा त्यांची सरासरी अधिक सरस आहे.
किशनने 47 चेंडूत 8 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 72 धावांची आतषबाजी केली. शिवाय, क्विन्टॉन डी कॉकसमवेत 68 धावांची महत्त्वपूर्ण सलामी देखील दिली. नंतर सुर्यकुमार यादवसमवेत दुसऱया गडय़ासाठी त्याने आणखी 43 धावा जोडल्या.
दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवरील या लढतीत बोल्ट व बुमराह यांनी एकत्रित 6 बळी घेत दिल्लीच्या डावाला खिंडार पाडले आणि तो संघ या धक्यातून शेवटपर्यंत सावरला नाही. शिखर धवन व पृथ्वी शॉ हे दिल्लीचे दोन्ही सलामीवीर ट्रेंट बोल्टच्या पहिल्या 3 षटकातच गारद झाले.
कर्णधार श्रेयस अय्यर व ऋषभ पंत यांनी 11 व्या षटकापर्यंत किल्ला लढवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण, नंतर 11 व्या षटकात अय्यर हा राहुल चहरच्या गोलंदाजीवर यष्टीचीत झाला आणि नंतर बुमराहने भेदक माऱयाच्या बळावर दिल्लीला चांगलेच जेरीस आणले. ऋषभ पंत, स्टोईनिस व हर्षल पटेल बुमराहचे सावज ठरले. 16 व्या षटकाअखेरच दिल्लीची 7 बाद 87 अशी वाताहत झाली होती. शेवटच्या टप्प्यात कॅगिसो रबाडाने 7 चेंडूत 12 धावा फटकावल्या आणि यामुळे दिल्लीला तिहेरी धावसंख्या गाठता आली.
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ झे. डी कॉक, गो. बोल्ट 10 (11 चेंडूत 2 चौकार), शिखर धवन झे. सुर्यकुमार यादव, गो. बोल्ट 0 (2 चेंडू), श्रेयस अय्यर यष्टीचीत डी कॉक, गो. चहर 25 (29 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), ऋषभ पंत पायचीत गो. बुमराह 21 (24 चेंडूत 2 चौकार), स्टोईनिस झे. डी कॉक, गो. बुमराह 2 (3 चेंडू), हेतमेयर झे. पंडय़ा, गो. कोल्टर-नाईल 11 (13 चेंडूत 1 चौकार), हर्षल पटेल पायचीत गो. बुमराह 5 (9 चेंडूत 1 चौकार), रविचंद्रन अश्विन झे. पंडय़ा, गो. बोल्ट 12 (9 चेंडूत 1 षटकार), प्रवीण दुबे नाबाद 7 (13 चेंडू), रबाडा धावचीत (बुमराह) 12 (7 चेंडूत 1 षटकार). अवांतर 5. एकूण 20 षटकात 9 बाद 110.
गडी बाद होण्याचा क्रम :
1-1 (धवन, 0.3), 2-15 (शॉ, 2.6), 3-50 (श्रेयस, 10.2), 4-57 (स्टोईनिस, 11.1), 5-62 (ऋषभ पंत, 11.4), 6-73 (हर्षल, 13.6), 7-78 (हेतमेयर, 15.2), 8-96 (अश्विन, 18.1), 9-110 (रबाडा, 19.6).
गोलंदाजी : ट्रेंट बोल्ट 4-0-21-3, कृणाल पंडय़ा 3-0-13-0, जयंत यादव 3-0-18-0, जसप्रित बुमराह 4-0-17-3, कोल्टर-नाईल 2-0-14-1, राहुल चहर 4-0-24-1.
मुंबई इंडियन्स : इशान किशन नाबाद 72 (47 चेंडूत 8 चौकार, 3 षटकार), क्विन्टॉन डी कॉक त्रि. गो. नोर्त्जे 26 (28 चेंडूत 2 चौकार), सुर्यकुमार यादव नाबाद 12 (11 चेंडूत 1 चौकार). अवांतर 1. एकूण 14.2 षटकात 1 बाद 111.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-68 (डी कॉक, 10.2).
गोलंदाजी : अश्विन 4-0-18-0, रबाडा 3-0-27-0, नोर्त्जे 2.2-0-25-0, स्टोईनिस 1-0-4-0, प्रवीण दुबे 3-0-29-0, हर्षल पटेल 1-0-8-0.
धावफलक : आरसीबी : फिलीप झे. पांडे, गो. रशीद खान 32 (31 चेंडूत 4 चौकार), पडिक्कल त्रि. गो. संदीप शर्मा 5 (8 चेंडूत 1 चौकार), विराट झे. विल्यम्सन, गो. संदीप शर्मा 7 (7 चेंडू), डीव्हिलियर्स झे. अभिषेक शर्मा, गो. नदीम 24 (24 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), वॉशिंग्टन झे. व गो. नटराजन 21 (18 चेंडूत 2 चौकार), गुरकिरत नाबाद 15 (24 चेंडूत 1 चौकार), मॉरिस झे. वॉर्नर, गो. होल्डर 3 (4 चेंडू), उदाना झे. विल्यम्सन, गो. होल्डर 0 (1 चेंडू), सिराज नाबाद 2 (3 चेंडू). अवांतर 11. 20 षटकात 7-120.
गोलंदाजी : संदीप शर्मा 4-0-20-2, होल्डर 4-0-27-2, नटराजन 4-0-11-1, नदीम 4-0-35-1, रशीद 4-0-24-1.
हैदराबाद : वॉर्नर झे. उदाना, गो. वॉशिंग्टन 8 (5 चेंडू), साहा यष्टीचीत डीव्हिलियर्स, गो. चहल 39 (32 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), पांडे झे. मॉरिस, गो. चहल 26 (19 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), विल्यम्सन झे. कोहली, गो. उदाना 8 (14 चेंडू), अभिषेक झे. गुरकिरत, गो. सैनी 8 (5 चेंडूत 1 षटकार), होल्डर नाबाद 26 (10 चेंडूत 1 चौकार, 3 षटकार), समद नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 6. 14.1 षटकात 5 बाद 121. गोलंदाजी : मॉरिस 2-0-19-0, वॉशिंग्टन 3-0-21-1, सैनी 2-0-30-1, सिराज 1-0-12-0, चहल 3.1-0-19-2, उदाना 3-0-20-1.