ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशीही कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. मागील 24 तासात दिल्लीत 5 हजार 739 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 3 लाख 75 हजार 753 वर पोहचली आहे. यामधील 30,952 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 4,138 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 3 लाख 38 हजार 378 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 6,423 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 45 लाख 76 हजार 724 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 17,029 आरटीपीसीआर टेस्ट आणि 43,095 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.
सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 9.55 % आहे. तर 3,113 झोन आणि 308 कंट्रोल रूम आहेत.