- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.83%
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मागील काही दिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मात्र, दिल्लीतून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. मागील 24 तासात 1,669 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आत्तापर्यंत 5 लाख 98 हजार 249 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सोमवारी दिल्लीत 803 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 17 हजार 808 वर पोहचली आहे. यामधील 9,255 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 78 लाख 62 हजार 807 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 34,288 आरटीपीसीआर टेस्ट आणि 28,152 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या.