ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत इयत्ता नववी ते अकरावीपर्यंतच्या शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी एसपीओ जारी करण्यात आला आहे. शाळा सुरू करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ञ समितीच्या मतांचा विचार लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. औपचारिकरित्या लवकरच याबाबत घोषणा केली जाणार आहे.
तज्ञ समितीने सूचविले आहे की, आता राजधानी दिल्लीतील शाळा लवकरच टप्प्याटप्याने सुरू केल्या पाहिजेत. सगळयात पहिल्यांदा मोठय़ा मुलांच्या शाळा सुरू केल्या पाहिजेत. त्यानंतर माध्यमिक आणि मग प्रायमरी शाळा सुरू कराव्यात. दरम्यान, दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिल्लीत शाळा कशा उघडायच्या यासंदर्भात एक तज्ञ समिती स्थापन केली होती. या तज्ञ समितीने दिल्लीतील कोविडची परिस्थिती पाहता शाळा उघडण्याबाबत आपले मत दिले आहे.