कोलकाता / वृत्तसंस्था
यजमान बंगालविरुद्ध अ गटातील रणजी लढतीत दिल्लीचा संघ तीन गडी बाकी असताना अद्याप 101 धावांनी पिछाडीवर आहे. बंगालने पहिल्या डावात 98.4 षटकात सर्वबाद 318 धावा जमवल्यानंतर दिल्लीने बुधवारी दिवसअखेर 75 षटकात 7 बाद 217 धावांपर्यंत मजल मारली होती. दिवसअखेरीस जॉन्टी सिद्धू 90 चेंडूत 8 चौकारांसह 49 तर सुबोध भाटी 25 चेंडूत 7 धावांवर नाबाद राहिले.
अन्य लढतींवर दृष्टिक्षेप
ओडिशा 436 वि. आसाम 238, बिनबाद 102
त्रिपुरा 121, 290 वि. महाराष्ट्र 208, 2-103
बिहार 208, 4-359 वि. मेघालय 179
नागालँड 243 वि. मिझोराम 3-318
विदर्भ 142, 247 वि. गुजरात 211, 4-74
मुंबई 5-372 वि. हिमाचल प्रदेश
रेल्वे 182 वि. कर्नाटक 65 षटकात 9-199
छत्तीसगड 4-270 वि. जम्मू व काश्मीर
सेनादल 279, 8-259 घोषित वि. झारखंड 153, 1-49
उत्तराखंड 109 वि. हरियाणा 5-50
चंदिगढ 134 वि. पुडूचेरी 4-37.