ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील सर्वात लहान कोरोनाबाधित ठरलेली 45 दिवसांच्या चिमुकलीची झुंज अखेर अपयशी ठरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत राहणाऱ्या या चिमुकलीला 14 एप्रिल रोजी दिल्लीतील कलावती सरन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 16 एप्रिल रोजी तिला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावेळी पासून तिच्यावर उपचार सुरू होते मात्र शनिवारी रात्री तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, सध्या दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 1896 असून 42 जणांना आपला जीव गमावला आहे. तर 72 रुग्णांची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.