मुंबई : कोविड19 ने ज्या पत्रकारांचे मृत्यू झाले आहेत, त्यांच्या नजिकच्या नातेवाईकांना केंद्र सरकारच्या ‘जर्नलिस्ट्स वेल्फेअर स्किम’मधून पाच लाख रूपयांची आर्थिक मदत केली जाते. त्यासाठी किती पत्रकारांचे कोरोनाने मृत्यू झालेत, याची माहिती संकलित करण्याचे काम पत्र सूचना कार्यालय, पीआयबीच्यावतीने करण्यात येत आहे. ज्या पत्रकाराचे निधन झाले आहे, त्यांच्या नातेवाईकांनी Additional Director General, press facilitiesPIB यांच्या नावाने अर्ज करायचे आहेत. त्यासाठी विशिष्ट नमुन्यात अर्ज करायचा असून, अर्जाचा नमुना पीआयबी च्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून घेता येईल.
अर्जासोबत काही कागदपत्रे पाठवायची आहेत. 1) पत्रकार असल्याचा पुरावा 2) कोविडने मृत्यू झाल्याची वैद्यकीय कागदपत्रे 3) डेथ सर्टिफिकेट 4)उत्पन्नाचे प्रमाणपत्र किवा आयटी रिटर्न भरल्याची कागदपत्रेअर्जासोबत वरील कागदपत्रे जोडून हा अर्ज prspib101@gmail.com या पत्यावर मेल करावयाचा आहे. ही माहिती PIB च्या वतीने देण्यात आली आहे.