वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू प्रँको यांचे वयाच्या 84 व्या वर्षी गोव्यात सोमवारी वृद्धापकालाने निधन झाले. 1962 च्या आशियाई क्रीडास्पर्धेत फुटबॉलचे सुवर्णपदक मिळविणाऱया भारतीय फुटबॉल संघामध्ये पँको यांचा समावेश होता. आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनचे प्रमुख तसेच अध्यक्ष शेख सलमान अल खलिफा यांनी प्रँको यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
भारतीय फुटबॉल क्षेत्रामध्ये प्रँको यांचे योगदान महत्त्वाचे आहे. 1960 ते 1964 हा कालावधी भारतीय फुटबॉल क्षेत्राचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. या कालावधीत भारतीय फुटबॉल संघाने आशियाई फुटबॉल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. प्रँको यांची या स्पर्धेतील कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी प्रँको यांना संघटनेच्यावतीने आदरांजली वाहिली आहे. 1960 च्या रोम ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय फुटबॉल संघात प्रँको यांचा समावेश होता. त्यांनी आपल्या फुटबॉल कारकीर्दीत 26 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.