शिकाऱयांकडून कृत्य : अडीच वर्षांचा नर गवारेडा
डिचोली / प्रतिनिधी
दिवगाळी नार्वे या मये व नार्वेच्या सीमाभागात खुल्या पठारावर मृतावस्थेत आढळून आलेल्या गव्यारेडय़ाचा बंदुकीची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. काडतुसीच्या बंदुकीने सदर गोळी झाडली असल्याने सदर गव्याच्या उजव्या बाजूने दहा ठिकाणी गोळय़ा लागल्याचे निदर्शनास आले आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, काल सोमवारी (दि. 8 जून) सकाळी कोणालातरी सदर गवा मृतावस्थेत दिवगाळी नार्वेच्या माथ्यावर खडकावड पडल्याचे निदर्शनास येताच त्याने सदर माहिती स्थानिक पंचसदस्या प्रति÷ा मिशाळ यांना दिली. त्यांंनी सदर बाबतची माहिती नार्वे पंचायतीला दिल्यानंतर पंचायतीकडून वन खात्याला कळविण्यात आले. वन खात्याचे केरी क्षेत्रीय वनाधिकारी विवेक गावकर, राऊंड फोरेस्टर प्रदीप सिनारी, वन रक्षक विष्णू आमोणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
प्रथमदर्शनी सदर गव्याला विषबाधा झाल्याचा संशय घटनास्थळी जमलेल्या लोकांंनी व्यक्त केला. मात्र शवचिकित्सेवेळी पशुवैद्यक डॉ. राजेश केणी यांंई सदर गव्याला दुसऱया बाजूला उलटविला असता त्याच्या उजव्या बाजूने दहा ठिकाणी छिदे पडल्याचे दृष्टीस पडले. त्यावरून सदर गव्यावर कोणीतरी अज्ञाताने काडतुसीच्या बंदुकीने गोळी झाडल्याचे निष्पन्न झाले. शवचिकित्सा केल्यानंतर सदर गव्याला त्याच ठिकाणी जेसीबी यंत्राच्या सहाय्याने खड्डा खोदून दफन करण्यात आले. या प्रकरणी वन खात्याने अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
सदर गवा हा सुमारे अडीच वर्षाचा असून त्याची शिकारीसाठी या भागात आलेल्या शिकाऱयांकडून हत्या झाल्याचे. डॉ. राजेश केणी यांनी सांगितले.