राज्यात 5536 नवे रुग्ण : 2819 जणांना डिस्चार्ज
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यभरात कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होत असून बाधितांच्या आकडय़ातही भरमसाठ वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी दिवसभरात तब्बल 5536 नव्या बाधितांची नोंद झाली असून 102 रुग्णांचा बळी गेला आहे. त्यानुसार बाधितांची संख्या 1,07,001 वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 2055 झाली आहे. तसेच दिवसभरात 2819 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जगभरात थैमान घालणाऱया कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. बाधित रुग्णांपैकी एकूण 40504 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 64434 बाधितांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी बेंगळुरात सर्वाधिक रुग्ण 1898 रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर बळ्ळारीमध्ये 452, गुलबर्गा 283, बेळगाव 228, म्हैसूर 220, तुमकूर जिल्हय़ात 207, कोलारमध्ये 174, मंगळूर 173, धारवाड 173, विजापूर जिल्हय़ात 153, कोप्पळमध्ये 144, दावणगेरे जिल्हय़ात 135, बागलकोट जिल्हय़ात 115, उडुपीत 109, हासनमध्ये 108, बेंगळूर ग्रामीण 107, रामनगरमध्ये 101 नवे रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी दिवसभरात राज्यात एकूण 37720 जणांची कोविड चाचणी करण्यात आली असून आतापर्यंत 12 लाख 42 हजार जणांची चाचणी करण्यात आली आहे.